मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी लवकरच चांगली बातमी येणार ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुण सध्या महाराष्ट्रात गरमागरमीचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी त्यांच्या कोट्यतील आमदारकी द्यावी यासाठी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी याबाबतीत राज्याच्या अँडव्होकेट जनरल आणि केंद्रीय गृहमंत्रालयकडे सरकारचा प्रस्ताव बसतो का नाही यासाठी विचारणा करणार असल्याचे सांगीतले होते.

परंतु आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीला लवकरच मान्यता देणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात चालू असलेला घटनात्मक पेच लवकरच मार्गी लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केल्याचे समोर येत आहे. परंतु कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती मिळाली नाही मात्र लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *