मोठी बातमी…! बाहेर अडकलेल्या लोकांना आपल्या राज्यात जाण्यास केंद्राकडून परवानगी

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर घोषित केलेल्या लॉक डाऊन मुळे परराज्यात गेलेले मजूर शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी जेथे आहे तिथेच अडकले होते. विविध राज्यात गेल्या ३६ दिवसांपासून अडकलेल्या मजुरांना विद्यार्थ्यांना पर्यटकांना तसेच धार्मिक कामांसाठी गेलेल्या लोकांना आता आपल्या घरी जाण्यासाठी केंद्र सरकार कडून परवानगी देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. त्यामुळे आता घरापासून दूर अडकलेल्या लोकांना दिलासा मिळणार आहे. त्यांना लवकरच आपल्या घरी जाता येणार आहे.  यासाठी त्यांना बस ची व्यवस्था करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *