आता ३० एप्रिल पर्यंत सरकारला धान विकणार्‍या विदर्भातील शेतकर्‍यांना मिळणार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ.

विदर्भातील धान उत्पादक शेतकर्‍यांसाठी  दिलासा देणारी बातमी आहे. कारण विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१ मार्च पर्यंतची मुदत राज्यसरकार ने एक महिन्याने वाढविली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार कडून मिळण्यात येणारा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ ३० एप्रिल पर्यंत सरकारला धान विकणार्‍या शेतकर्‍यांना  मिळणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी दिली आहे.

यंदा विदर्भात मोठ्या प्रमान्त धानाचे उत्पन्न झाले. राज्यसरकार कडून धानाला १८०० रुपये भाव व ७०० रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खाजगी विक्री न करता शासकीय खरेदी केंद्राकडे जास्त कल दिला. शेतकरी मोठी प्रमाणात केंद्रावर धान घेऊन येत होते मात्र कोरोनाची साथ आल्याने शेतकर्‍यांची  गैरसोय झाली. त्यामुळे शासनाने धान खरेदीसाठी दिलेली मुदत ३१ मार्च वरुण ३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी यासाठी केंद्राकडे मागणी केली होती. त्यामुळे आता ३० एप्रिल पर्यंत धान विक्री करणार्‍या विदर्भातील शेतकर्‍यांना राज्यसरकार कडून देण्यात येणार १८०० रुपये हमीभाव व ७०० रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *