ऑनलाईन लुडो खेळणे पडले महागात, पत्नीसोबत हरल्याने पतीने पत्नीच्या पाठीचा कणाच मोडला.

लॉकडाऊन असल्या कारणाने सर्वांना सध्या घरीच राहावे लागत आहे. बाहेर जाऊन पोलिसांकडून दांडू खाण्यापेक्षा घरी राहणे अनेकांनी पसंद केले आहे. परंतु घरी राहून करायचे काय ? तर सध्या मोबाईल वर भरपूर ऑनलाईन गेम खेळता येतात. त्यातीलच एक लुडो नावाचा गेम सर्रास खेळला जात आहे. परंतु गुजरात मधील एका कुटुंबाला हा गेम खेळणे चांगलाच महागात पडला आहे. कारण वारंवार पत्नी कडून हरल्याने पती व पत्नीत सुरू झाले, भांडण एवढे वाढले की पतीने रागाच्या भरात येऊन चक्क पत्नीला मारहाण केली व यात पत्नीच्या पाठीचा कणा असून अखेर पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सदर दाम्पत्य हे वेमाली येथे राहणारे असून पती एका इलेक्ट्रिक कंपनीमध्ये नोकरी करतो तर पत्नी शिकवण्या  घेते. लॉकडाऊन आपला टाईम पास होईल या हेतूने पतीने पत्नीला लूडो खेळण्यास मनवले. मात्र नंतर स्वतःच पत्नीकडून सतत हरल्यामुळे पत्नीसोबत वाद घालून तिला मारहाण केली. उपचारानंतर पत्नीने आपल्या पतीकडे जाण्यास नकार दिला होता मात्र पती कडून माफीनामा दिल्यानंतर पुन्हा ती आपल्या पतीसोबत येण्यास तयार झाली आहे. तर पतीला पुन्हा अश्या प्रकारच्या मारहाण न करण्यासाठी ताकीद देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *