,यवतमाळमध्ये कोरोनाचे १६ नवे रुग्ण.

राज्यातील यवतमाळ मध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असून यवतमाळ मध्ये आज १६ नवीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आता यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून अत्यंत गांभीर्याने पाऊले उचलायला सुरवात केली आहे.

काल यवतमाळ मध्ये १५ नवीन रुग्ण मिळाले होते त्यामुळे रुग्णांची संख्या ३० वर पोहचली होती. आज पुन्हा नवीन १६ रुग्णांची भर झाली असून यवतमाळ मध्ये आता कोरोनाचा जोरात प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षात उपचार सुरू असलेल्या ॲक्टिव्ह करोनाबाधितांची संख्या ५० वर पोहचली. जिल्ह्यात आतापर्यंत करोना संसर्गाची लागण झालेल्या ६० रूग्णांची नोंद झाली आहे. पुन्हा २६४ संशयित रुग्णांच्या चाचणीचा अहवाल अजून प्राप्त झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच आता पर्यंत १० जणांनी कोरोनावर मात केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *