भारताने लॉकडाउन उठविण्यास घाई केल्यास होतील ‘हे’ परिणाम.

भारतात सध्या लॉकडाउन २ चालू आहे. हा लॉकडाउन ३ मे पर्यन्त असणार आहे. पहिला २१ दिवसांचा लॉकडाउन संपल्यानंतर १५ मार्च पासून दुसरे लॉकडाउन सुरू झाले. परंतु भारताने लॉकडाउन उठविण्यास घई करू नये असे मत जागतिक तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. जगातील आघाडीचे मेडिकल जर्नल Lancet चे एडिटर इन चीफ रिचर्ड हॉर्टन यांनी एवढा लॉकडाऊन भारताला पुरेसा नसल्याचं म्हटलं आहे.

रिचर्ड यांच्या मते भारताने लॉकडाउन उठविण्यास घाई करण्याचे कोणतेही कारण नाही. दुसर्‍या लॉकडाउन नंतर सर्व सुरळीत होईल असे लोकांना वाटत आहे. मात्र भारताने लॉकडाउन उठविण्यास घाई केली तर याचे उलट परिणाम देखील होऊ शकते. भारताने कमीत कमी दहा आठवळे लॉकडाउन ठेवण्यासंबंधी विचार करायला हवा कारण कोणत्याही देशातून कोरोना पुर्णपणे जाण्यात किती कालावधी लागेल याची खात्री नाही. जर दहा आठवळ्यांचा लॉकडाउन घेण्यात आला तर याचा फायदा नक्की होईल व सर्वसामान्यांचे जीवनमान सुरळीत होईल असे मत रिचर्ड यांनी व्यक्त केले आहे. जर भारताला दहा आठवल्याचा लॉकडाउन करायचा असेल तर पुन्हा एक महिना लॉकडाउन वाढवावा लागेल.

परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेन सोडणे सध्या तरी शक्य नाही: नितीन गडकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *