परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेन सोडणे सध्या तरी शक्य नाही: नितीन गडकरी

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेन सोडण्याची विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्राकडे केली होती. परंतु सध्याच्या स्थितीत ट्रेन सोडणे अशक्य असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याचा सन्मान आहे. परंतु सध्यातरी हे शक्य नाही. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेन सोडली तर त्यामध्ये कोरोनाचा संसर्ग होईल. शिस्त पाळली जाणार नाही. ट्रेन चालू करण्यात आली असे लोकांना माहीत झाले तर वांद्रे रेल्वे स्टेशनवर झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. तसेच दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमातून कोरोनाचा प्रसार झाला तसा काही प्रकार घडून आला तर त्याला जबाबदार कोण? अशी विचारणा देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यामुळे सध्याच्या स्थितीत तरी परराज्यातील कामगारांसाठी ट्रेन सोडली जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *