अबब….! ९३ टक्के लोकांना ‘या’ बाबतीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास.

देशात आलेल्या कोरोनाच्या संकटावर मोदी सरकार प्रभावी उपाययोजना करत असून मोदी सरकार कोरोनाच्या संकटावर मात करणार असे ९३ टक्के लोकांना वाटत आहे. असे एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

IANS-C-voter covid-19 tracker ने हे सर्वेक्षण केले. लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून यांचे सर्वेक्षण चालू झाले होते यामध्ये पहिल्या दिवशी देशातील ७६.८ टक्के लोकांनी मोदी सरकारवर विश्वास दाखविला होता परंतु २१ एप्रिलला केंद्र सरकारला पाठिंबा देणार्यांरची संख्या चक्क ९३.५ टक्क्यावर पोहचली. या सर्वेक्षणात लोकांना आपल्या प्रतिक्रिया देण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यामुळे बहुतेक लोकांनी केंद्र सरकार योग्य रीतीने परिस्थिती हाताळत असून लवकरच मोदी सरकार कोरोनावर मात करेल अशा कमेंट्स तेथे लोकांनी केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *