मोठी बातमी…! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचे निधन.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांनी शेवटचा श्वास दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला. ते ८९ वर्षाचे होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली. आम्ही योगी आदित्यनाथ यांचे पिता आनंद सिंह बिष्ट यांच्या मृत्यूमुळे शिक व्यक्त करत अहो असे उत्तर प्रदेशचे अतिरिक्त प्रधान सचिव अवनिश अवस्थी यांनी सांगितले.

योगी आदित्यनाथ यांचे वडील काही महिन्यांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार चालू होते. आनंद सिंह बिष्ट यांना दीर्घ काळापासून मूत्रपिंडाचा त्रास होता. आनंद सिंह बिष्ट हे उत्तराखंड मधील फॉरेस्ट रेंजर होते. ते १९९१ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी वास्तव्य करत होते.

लॉक डाऊन मुळे योगी आदित्यनाथ हे आपल्या पित्याच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकणार नाही. असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *