कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्राकडून उच्चस्तरीय समिती स्थापन.

वाढत्या कोरोंनाच्या प्रादुर्भावामुळे आता केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून ती समिती देशातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणांची पाहणी करणार आहे. महाराष्ट्रातील व मुंबईतील देखील कोरोनाचा आकडा वाढत आहे त्यामुळे आता ती समिती महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणांना भेट देऊन तेथील आरोग्यसेवा, पोलीससेवा याबाबत आढावा घेणार आहे. सदर समिती ही उद्यानमंत्रालयाच्या माध्यमातून येणार असून त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या समितीमध्ये उच्च सचिव व सचिव यांचा समावेश असून कोरोसाठी हॉटस्पॉट ठरत असलेल्या ठिकाणी रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल यावर उपाययोजना करता येईल याचा आढावा घेणार आहे.  कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. सध्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे.

घराबाहेर पडू नका अन्यथा पुन्हा निर्बंध लावण्यात येईल: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *