डॉक्टर व पोलीसांसोबत ‘यांचा’ ही लॉकडाऊन मध्ये मोलाचा वाटा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत डॉक्टर्स नर्सेस रुग्णांना सेवा देत आहे. तर पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य बजावत आहे. यांच्या सोबतच सामान्य जनतेला त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करणारे दुकानदार देखील कोरोनाच्या भीतीला बाजू सारून सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करत करत आहे.

दुकानदारांना जास्त किंमतीत वस्तू विकू नये अशी सूचना देण्यात आली आहे. सध्या देशात असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जास्त होतांना दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. त्यामुळे दुकानदारही आपल्या सेवेला जास्त महत्त्व देत आहे. कोरोना हा रोग कोणाला झाला हे समजून येत नाही त्यामुळे दुकानदारांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण त्यांचा संपर्क हा जास्तीत जास्त लोकांसोबत येत असतो. म्हणून त्यांनीही आता खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच सरकारनेही दुकानदारांचे मनोधैर्य वाढविण्याची गरज आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *