जागतिक आरोग्य संघटनेनेकडून भारताच्या कोरोनावरील उपाययोजनांची प्रशंसा

कोरोना व्हायरस चा प्रसार जगभरात होतांना भारताने योग्य वेळी योग्य त्या कठोर उपाययोजना केल्या त्यामुळे   भारताच्या या कार्याचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सहा आठवड्यांचा देशव्यापी बंद ही खूप मोठी गोष्ट आहे. सोशल डीस्टंसिंग ठेऊन आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, सर्व खबरदारी घेणे कोरोनाबाधितांना विलगीकरण कक्ष उपलब्ध करून देणे, इत्यादी बाबतीत भारताला यश येतांना दिसून येत आहे.  ‘अनेक आव्हाने व संकटे असताना देखील भारताने कोरोना विरूद्ध चांगला मुकाबला केला.’ अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकाने  आपापल्या परीने प्रयत्न करायला हवे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *