मोठी बातमी….! ग्रीन झोन मधील उद्योगांना परवानगी देण्याचा विचार.

कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून लॉक डाऊन ३ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग बंद पडले आहे. त्यामुळे सरकारच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत आहे . त्यामुळे आता ग्रीन झोन मधील नियम शिथिल करून तेथील उद्योग चालू करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

आर्थिक स्थितीचा आढावा उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला असून आता सरकारी कर्मचाऱ्याचा पगारावर देखील याचा परिणाम पडणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण नाही आहे अशा ग्रीन झोनमध्ये उद्योग चालू करण्याचा विचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *