महत्वाची बातमी..! ग्राहकांनी वीजबिलासाठी स्वत: मिटरचे रीडिंग घेऊन पाठवावे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने लॉकडाउन चालू आहे. त्यामुळे संचार बंदी चालू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीजबिला संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचं विजबिल भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असून ज्या ग्राहकांकडे मिटर रीडिंग घेण्याची सोय असेल त्यांनी स्वत: रीडिंग घेऊन पाठविण्याचे आवाहन ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांनी केले आहे. महावितरणच्या सर्व ग्राहकांनी त्यांच्या मीटरचे रीडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाइट किंवा मोबाइल एप वर आपलोड करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांना रीडिंग घेण्याची सोय नसेल अशा ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्यात येईल. 

कसं पाठवायचं मीटर रीडिंग? 

आपल्या घरातल्या विजेचं रीडिंग स्वतःच घ्यावं आणि महावितरणला या वेबसाइटवर पाठवून द्यावं, असं सांगण्यात येत आहे. महावितरणच्या कन्झ्युमर पोर्टलवरून किंवा मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरचं रीडिंग अपलोड करण्याची सोय आहे. महावितरणच्या ग्राहकांनी स्वत:च मीटर रीडिंग घेऊन (सेल्फ मीटर रीडिंग) पाठवावं. लॉकडाऊन’मुळे मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावं, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.

कोरोना विरुध्दची लढाई जिंकूनही तो समाजासमोर हरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *