दिलासादायक…! गोवा कोरोनामुक्तीच्या मार्गावर, अकरा दिवसांपासून नवा रुग्ण नाही.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. देशातील कोरोनाचा आकडा वाढतच आहे. परंतु गोव्यातून दिलासादायक बातमी येत आहे. कारण गोव्यात गेल्या ११ दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे समोरही एकही रुग्ण आढळून न आल्यास १७ एप्रिल नंतर गोवा राज्य ग्रीन झोन म्हणून घोषीत केलं जाऊ शकतं. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोव्यातील दोन जिल्ह्यांपैकी दक्षिण गोवा हा जिल्हा अगोदरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ग्रीन झोन जाहीर झाला आहे. आता उत्तर गोवाही ग्रीन झोन जाहीर झाल्यास संपूर्ण गोवा राज्य ग्रीन झोन होईल.

गोव्यात आतापर्यंत कोरोनाचे ७ रुग्ण सापडले होते. यापैकी ५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून बाकी दोघांवर उपचार चालू आहे. ४ एप्रिल पासून गोवा राज्यात कोरोणाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. गोव्यात कोरोना नियंत्रित असला तरी केंद्राकडून जाहीर केलेल्या लॉकडाऊन चे लोकांनी पालन करावे असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. २० एप्रिल पासून गोव्यातील काही शासकीय कार्यालये चालू करण्यात येणार असून गोव्यातील उद्योगांचे कामकाज चालू करण्याबाबत केंद्राच्या निर्देशावर आधारित असेल असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *