कोरोना विरुध्दची लढाई जिंकूनही तो समाजासमोर हरला.

संपूर्ण जगात सध्या कोरोना विरुध्द युद्ध चालू आहे. कोरोनाचं संकट उभ असल्यामुळे सर्वांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना रोगावर ज्या रुग्णांनी मात केली त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करतांना आपण बघितले. परंतु मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात कोरोनाला हरवून घरी आलेल्या रुग्णांवर घर विकण्याची वेळ आली आहे.

दीपक शर्मा नामक व्यक्ती कोरोनाच्या संक्रमणातून पूर्णतः बरा झाला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु आजूबाजूच्या लोकांनी त्याचे स्वागत करण्याऐवजी त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे. दिपकने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली पण समाजाने केलेल्या अशा वागण्याने दिपकचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळेच तो आपले घर विकून दुसरीकडे राहायला जाण्याच्या तयारीत आहे. शेजाऱ्यांच्या अशा वागण्याने त्याने चक्क आपल्या घरावर हे घर विकायचे आहे असा बोर्ड देखील  लावला आहे. रुग्णालयात असतांना डॉक्टर आणि नर्स यांनी दिलेल्या धिरामुळे मी पूर्णतः बरा झालो असे दिपकने सांगितले. परंतु समाजातील लोकांच्या अशा वागणुकीमुळे मी खूप दुखी असून एखाद्या रुग्णासोबत अशी वागणूक करू नये असेही त्याने म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *