मोठी बातमी….! दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीचीही परीक्षा रद्द.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ईयत्ता १० विचा भूगोलाचा पेपर पुढे ढगलण्यात आला होता. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने आता दहावीचा शिल्लक असलेला पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नववी व अकरावी ची परीक्षा देखील रद्द करण्यात निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करता राज्यात लॉकडाऊन वाढविला आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *