सलून व्यावसायिक कारागिरांना व गरजूंना धान्य वाटप.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय तसेच कामगारांना काम मिळणे बंद झाले आहे . अनेक सलून व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाले असून त्यांचा रोजगार हिरावला गेला आहे . त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. हीच बाब लक्षात घेऊन काही समाज बांधवांनी एकत्र येऊन सलून व्यावसायिक व कारागिरांना जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या आहे. यामध्ये गहू, तांदूळ, तेलाचे पॉकेट नगाजी देवस्थान राजुरा येथे वाटप करण्यात आले. याकरिता सर्वश्री विजय वाटेकर, अरुण जमदाडे, गणेश निंभोरकर, प्रदीप वाटेकर, अरुण वाटेकर, हरिदास हनुमंते, समीर वाटेकर, नंदकिशोर आंबेकर, छोटू येसेकर, शेषराव मांडवकर, अभय हनुमंते, प्रदीप सुर्वे, गंगाधर वाटेकर, अनिल पंदीलवार गुरुजी, मनोहर जमदाडे, भास्कर वाटेकर, देवा राजूरकर, व लांजेवार साहेब यांनी राजुरा गरजू नाभिक व्यावसायिक व सलून कारागिरांना जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *