धक्कादायक….! बायकोला लॉकडाऊन मुळे भेटता न आल्यानं नवऱ्याची आत्महत्या.

सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कित्येक जणांना आपल्या परिवारापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशातील एका माणसाने पत्नी विरहामुळे आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.

लॉकडाऊनच्या काळात दारू मिळत नसल्याने काही जणांनी आत्महत्या केल्याचे ऐकले आहे. परंतु पत्नीच्या विराहामुळे एखाद्या पती ने आत्महत्या केल्याची ही पहिलीच वेळ. लॉकडाऊन मुळे सदर व्यक्तीची बायको ही तिच्या आई वडिलांच्या गावाला अडकली होती.
तिला लॉकडाऊन मुळे तिला सासरी येणं शक्य झालं नाही. पत्नीपासून हा दूरावा सहन होत नसल्यामुळे त्याने आत्महत्या केली. सदर व्यक्तीची नाव राकेश सोनी आहे. पत्नीचा विरह सहन न झाल्याने राकेश ने आत्महत्या केली आहे असे पोलिस निरीक्षक आलोक राव यांनी सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *