कोरोनाच्या चाचण्या होणार मोफतचं, सुप्रीम कोर्टाचे निर्देश.

सपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनाची चाचणी आता मोफत होणार आहे. खाजगी अथवा सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी मोफत करा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. करोनाचा रुग्णांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी ही सरकार आणि पोलिसांची आहे. करोना रुग्ण होम क्वारंटाइन असल्यावर किंवा वैद्यकीय पथकांकडून जिथे त्यांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे तिथे रुग्णांना सुरक्षा पुरवावी, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिलेत.

केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या सर्व प्रयोगशाळा मग त्या सरकारी असो की खासगी या ठिकाणी करोना व्हायरसची चाचणी मोफत करण्यात यावी, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने तात्काळ यासंबंधी आदेश जारी करावेत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. डॉक्टरांवर होण्यार्यार गैरव्यवहारावर बोलतांना ‘ डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी याच्यामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार आणि पोलिस प्रशासनाने त्यांना सुरक्षा पुविण्याचे कार्य करावे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *