पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनावर सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्तोक्ती.

देशात आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात मिळविण्यासाठी देशात सध्या लॉकडाउन चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील लाइट बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनावरून नेटकरी आणि विरोधकांनी टीकेची झोडही उडवली आहे. विरोधकांच्या या टीकेला राज्यातील भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत मोदींच्या आवाहनामागील कारण सांगितले आहे.

मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये पाच मुद्दे मांडले आहेत. त्या मुद्यातून त्यांनी मोदींचं आजचं आवाहन कसं योग्य आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न केलाय.

काय आहेत मुद्दे ?-
१) केवळ हर हर महादेव करून युद्ध जिंकता येत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होते.
२) निव्वळ चले जाव ची घोषणा देऊन इंग्रज पळून जाणार नाहीत, हे महात्मा गांधींनाही माहित होते.
३) तळ्याचे पाणी पिल्याने जातीयता नष्ट होणार नाही, हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही माहित होते.
४) रक्त मागून स्वतंत्र मिळणार नाही, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना माहित होते.
५) जय रघूवीर समर्थ म्हणून जमसमुदाय एकत्र येणार नाही, हे रामदास स्वामींनाही माहित होते.

दिवे लावून, टाळ्या वाजवून करोना जाणार नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माहित आहे. पण या सर्व क्रियांमुळे जनतेचे मनोधैर्य वाढते. जे वाढणे आजच्या संकट समयी काळाची गरज आहे, असं ट्विट मुनगंटीवार यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *