पत्रकार संघाकडून स्वछता दूताना मास्क वाटप,कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचा पुढाकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांमध्ये सफाई कामगारांची कामगिरी ही अत्यंत महत्वाची असते संपूर्ण शहर साफ करून ते आपले कर्तव्य पार पाडत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गडचांदूर नगर परिषदेच्या स्वच्छता दूत (सफाई कामगारांना)  मास्क वाटप करण्यात आले. यावेळी नगर परिषदेकडून सॅनिटायजर सुद्धा सफाई कामगारांना देण्यात आले मास्क व सॅनिटायजर वाटप करताना नगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेळकी, नगरसेवक गटनेता विक्रम येरने, कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक खेकारे, सल्लागार मुमताज अली,सहसचिव गणेश लोंढे, प्रसिध्दी प्रमुख मयूर एकरे, सदस्य अतुल गोरे  यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *