डॉक्टर , नर्स , पोलिसांवर हल्ला करणार्‍यांना फोडून काढा. : राज ठाकरे

देशावर असलेल्या कोरोनाच्या लढ्यात आपले घरदार सोडून आपल्या जिव धोक्यात घालून पोलिस आणि डॉक्टर आपले कर्तव्य बजावत आहे. अशा वेळी जर त्यांच्यावर हल्ला होत असेल तर त्या हल्ला करणार्‍यांना फोडून काढा. अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली आहे.

देशासाठी आपले कर्तव्य पार पाडणार्‍या पोलिस डॉक्टर नर्स यांच्यावर हात उगारलाच कसं जाऊ शकतो ? असा सावळही त्यांनी उपस्थित केला. आणि जे उगारत असेल त्यांना फोडून काढा अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.  राज्यावरील संकट दूर कराच असेल तर लॉकडाऊनची शिस्त पाळण्याचे देखील त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *