सल्युट..!कोरोनविरुद्धच्या लढ्यात ३० हजारापेक्षा जास्त निवृत्त डॉक्टर होणार सामील.

सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात थैमान घातले आहे. कोरोना बाधीत रुग्णांसाठी सध्या देशातील सर्व डॉक्टर आपल्या कुटुंबाला सोडून त्या रुग्णांची सेवा करत आहे. बाकीच्या वेळी जरी काही लोकं हे डॉक्टरांना मारहाण वगैरे करतात परंतु या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपले कर्तव्य पार पाडत आहे.
त्यातच आता कोरोना विरुद्ध लढाई लढण्यासाठी जवळपास ३० हजार पेक्षा जास्त निवृत्त डॉक्टरांनी स्वेच्छेने तयारी दर्शवली आहे. २५ मार्चला सरकारकडून आवाहन करण्यात आले होते की सेवानिवृत्त सरकारी, सशस्त्र दल वैदकिय सेवा, तसेच खाजगी डॉक्टरांनी कोरोनविरुद्धच्या लढाईत आपलं योगदान द्यावं. यासाठी निती आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर देण्यात आलेल्या लिंक वर ३०१०० डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात टाकून कोरोनविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *