महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे संतापले म्हणाले, ‘जमत नसेल तर घरी जा’.

आपल्या कडक स्वभावामुळे तुकाराम मुंढे हे नेहमी चर्चेत असतात. काम शिस्तीत झाले पाहीजे याकडे त्यांचा कल असतो. सध्याच्या कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर नागपुर महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांचा क्लास घेतला. त्यांनी नागपुर महानगरपालिकेच सर्वात चांगलं रुग्णालय उखिरड्यासारखं झालं त्यावरून ते चांगलेच संतापले. ‘महापालिकेचे काही डॉक्टर नीट प्रॅक्टीस करत नाही, ज्यांना जमत नाही त्यांनी घरी जावं’. अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी वॉर रूममध्येच अधिकारी वं कर्मचार्‍यांना झापलं.

नागपुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाउनचे काटेकोर पालन होत नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना यश मिळत नाही आहे. नागरिकांनी लॉकडाउनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल असा ईशारा तुकाराम मुंढे यांनी दिला होता. त्याचबरोबर प्रशासनातील गोपनीय माहिती बाहेर पडत असल्याने तुकाराम मुंढे प्रचंड नाराज आहे.

नागरिक गर्दी करत असल्यामुळे कॉटन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. भाजी घेऊन नागपुरात येणारी वाहने आता कॉटन मार्केटमध्ये न पाठवता शहरातील विविध भागात पाठवण्यात येतील. यामुळे एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाईल, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *