महत्वाचे…! खाजगी क्षेत्रातील कामगारांना संपूर्ण वेतन देण्याचे आदेश जारी.

सध्या संपूर्ण देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग ठप्प आहे त्यामुळे सरकारी तसेच खाजगी उद्योगांमध्ये काम करणार्याो कामगारांना घरी बसविण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सर्व खाजगी क्षेत्रातील कामगारांना त्यांचे वेतन देण्यात यावे तसेच त्याच्या वेतनात कोणतीही कपात करू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.
आता या संबंधीचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. सध्या लॉकडाउनच्या परिस्थीत कोणत्याही कामगाराच्या पगारात कपात अथवा त्याला बिनपगारी ठेऊ नये त्याच बरोबर कोणत्याही कामगाराला कमावरून कमी करू नये असेही आदेश देण्यात आले आहे. राज्यसरकारचा हा आदेश महाराष्ट्रातील सर्व निमशासकीय, औद्योगिक, वाणिज्यीक, व्यापारी व दुकाने यांना लागू होणार आहे.
श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांचे पत्र व गृहमंत्रालयाचे आदेश आणि राज्यशासनाच्या महसूल व वन विभागाच्या संदर्भाने राज्य शासनाने हा निर्णय जारी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *