आदिवासी महामंडळाकडून “खावटीकर्ज” वाटप करा, विलास मडावी यांची मागणी.

अनुसुचित क्षेत्रातील आदिम,गोरगरीब आदिवासी समाजाला कोरोना या आजारापासून बचावासाठी “खावटीकर्ज” वाटप हे आदिवासी महामंडळाकडून वितरीत करण्याची विलास मडावी महासचिव राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे यांची मागणी केली आहे.
भारतात कोरोना आजाराचे प्रसार दिवसागणिक वाढत असल्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार या बद्दल गंभीर आहे सन 2013 ते आजपर्यंत आदिवासी समाजाला व आदिम जमातीला खावटी कर्ज बंद होते ते खावटी कर्ज पूर्वत सुरू करण्यात यावे  असे निवेदन आदिवासी विकास मंत्री,मा नामदार ऍड के,सी पाडवी यांना दिले महाराष्ट्र राज्यातील डोगराळ  व दुर्गम भागातील राहणारा आदिवासी समाज उपासमारी होणार नाही व आदिवासी सुविधा पासून वंचित असल्याने खावटी कर्ज  हे आदिवासी महामंडळ कडून  वितरित केल्यास त्यांना संचारबंदी च्या काळात मदत होईल,आदीवासी भागातील मंजूर, शेतकरी, विद्यार्थी, व युवक संचारबंदी लागू असल्याने   होरपळून निघत आहे व त्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या गरज उपलब्ध नाही अशावेळेस आपल्याला विभागातुन आदिवासी भागातील लोकांसाठी खावटी कर्ज हे आदिवासी महामंडळाकडून वितरित करण्याचा यावा अश्या प्रकारचा निर्णय आपल्या स्तरावरून घेण्यात आल्यास संपूर्ण राज्यतील दुर्गम भागातील राहणाऱ्या आदिम,आदिवासी समाजाला मोलाचे सहकार्य लाभेल तरी सादर खावटी कर्ज वाटप करण्यास  मंजुरी देण्यात यावी अशी विनंती विलास मडावी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *