अवघ्या १० दिवसांत ‘त्याने’ कोरोनाला हरविले.

सध्या संपूर्ण जग हे कोरोना विषाणूमुळे त्रस्त होऊन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. १४ एप्रिल पर्यन्त लॉकडाउन घोषित करण्यात आलं आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे अशांवर रुग्णालयात उपचार चालू आहे तर जे व्यक्ति कोरोना संशयीत आहे त्यांना होम क्वारंटइन करण्यात आलं आहे.

कोरोनाची भीती जारी दिवसेनदिवस वाढत असली तरी एक मनाला समाधान करणारी बातमी आहे. एका तरुणाने कोरोनाला अवघ्या १० दिवसांत हरवलं आहे. बवनपुरात राहणारा राहुल नामक मुलगा स्कॉटलँड मधून आपल्या मायदेशी परतला. त्यानंतर त्याला २० मार्चला कोरोनाचे लक्षण आढळून आले, २१ मार्चला त्याच्या तपासण्यातून त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालयात १० दिवस उपचार घेतल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारना जाऊ लागली. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट केली असता त्याचा रीपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर २ दिवसांनी केलेल्या टेस्ट मध्ये सुद्धा त्याचा रीपोर्ट  निगेटिव्ह आला. त्यामुळे आता राहुलला रुग्णालयातून सोडण्यात आलं असून पुढील १४ दिवस त्याला होम क्वारंटइन करण्यात आलं आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे संतापले म्हणाले, ‘जमत नसेल तर घरी जा’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *