महाराष्ट्रातील उन्हाचा पारा आठवळयाभरात वाढणार.

सध्या कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे त्यातच अवकाळी पावसाने शेतकर्यांरचे मोठे नुकसान केले. परंतु आता येत्या आठवळ्याभरात उन्हाचा पारा वाढणार आहे. मागील दोन आठवळ्यात महाराष्ट्रातील गोंदिया, जळगाव कोल्हापूर, नागपुर, चंद्रपुर, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा,गडचिरोली सह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावली होती.
आता एप्रिल महिन्याच्या पाहिल्याच आठवळ्यात उन्हाचा कडाका वाढणार असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, व इतर ठिकाणी उन्हाचा पारा साधारण कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल असा अंदाज कुलबा वेधशाळेने वर्तविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *