शेतकर्‍यांच्या कापसाचे पैसे लवकरात लवकर खात्यात जमा करण्यात यावे, रोशन आस्वले यांची मागणी.

सध्या देशात व राज्यात असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व जनता संकटात सापडली आहे. त्यातच शेतकर्‍यांची परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. कारण यंदा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपला कापूस सीसीआय ला विक्री केला त्यामुळे शेतकर्यां चे पैसे अडकले आहे. सध्याच्या लॉकडाउन च्या परिस्थिती शेतकर्यांेना आपल्या दैनदिन गरजा भागविण्यासाठी लागणारे सामान खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसा उपलब्ध नाही आहे त्यामुळे शेतकर्‍यांच्या कापसाचा पैसा लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी रोशन आस्वले यांनी केली आहे.
रोशन आस्वले यांनी याबाबतचा ईमेल अकोला येथील सीसीआय मुख्यालयाला केला असून शेतकर्‍यांची पैशाची समस्या तातळीने दूर करावी अशी विनंती केली आहे. यापूर्वीही येस बँकेतील घोटल्यामुळे शेतकर्‍यांचे पैसे अडकले होते आणि आता कोरोनामुळे पुन्हा शेतकर्‍यांना आर्थिक तुटवळ्याचा सामना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *