सलमान खान करणार २५ हजार फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत असणार्‍या लोकांची मदत.

सध्या संपूर्ण जगात कोरोनाचा कहर चालू असून कोरोंनामुळे संपूर्ण भारत लॉकडाउन आहे. लॉकडाउनमुळे अनेक लोकांना खाण्यापिण्याच्या  समस्या निर्माण झाल्या आहे. हातावर आणून ताटावर खाणार्याण लोकांना लॉकडाउन मुळे उपासमारीची समस्या निर्माण यासाठी अनेक संस्था त्यांच्या मदतीला समोर आल्या आहे. तसेच अनेक दानशूर लोकांनी कोरोनाशी लढण्यासाठी आर्थिक मदत देखील केली आहे.

त्यातच आता अभिनेता सलमान खान हा देखील लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे, त्याने फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत असणार्या  २५ हजार लोकांना मदत करणार असून त्यांच्या अकाऊंटच्या डिटेल्स त्याने मागवल्या आहे. यामध्ये जुनीयर आर्टिस्ट, स्पॉटबॉय, मेकअप आर्टिस्ट, लाइटमॅन, अशा प्रॉडक्शन संबंधी लोकांचा समावेश आहे. सलमान खान ही मदत त्याच्या बीइंग ह्युमन या संस्थेच्या माध्यमातून करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *