अभिमानास्पद….! हीच खरी एकता, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मुस्लिम बांधवांनी दिला खांदा.

सध्या देशात कोरोनामुळे खूप भीती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे लोक आपल्या घरातच स्थिरावले आहे. लोकांनी घरातच राहावे यासाठी शासनाकडून देखील आवाहन करण्यात येत आहे परंतु कोरोंना संसर्ग होईल या भीतीने लोकं आपली माणुसकी देखील विसरत असल्याची घटना समोर आली आहे. कोरोनामुळे एखादा व्यक्ति मरण पावला असतं त्याला खांदा द्यायला सुद्धा लोक भीत असल्याचे दिसून येत आहे. बुलंदशहर मध्ये अशीच एक घटना घडली आहे मात्र त्या घटनेतून एक सकारात्मक संदेश देणारी ठरली आहे.

बुलंदशहर मध्ये सध्या चालू असलेल्या लॉकडाउन दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला परंतु प्रवासाची काही सोय चालू नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या अंत्यसंस्काराला येनं शक्य झाल नाही. त्यामुळे तेथील राहणार्या् मुस्लिम बांधवांनी त्याच्या अंतयात्रेत प्रेताला खांदा दिला, इतकेच नाही तर हिंदू पद्धतीने या व्यक्तीचे अंत्यसंस्कारही केले. सोशल मीडियावर ही घटना प्रचंड वायरल होत असून या व्हीडिओला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला जात आहे. या व्हीडिओ मधील मुस्लिम तरुण आपल्या खांद्यावर प्रेत घेऊन जात असून हिंदू संस्कृति प्रमाणे ‘राम नाम सत्य है’ असे म्हणतांना देखील दिसत आहे. या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी तिरळी बांधणे इत्याडी याच तरुणांनी केल्याचे समोर येत आहे. सदर मेलेल्या व्यक्तीचे नाव रविशंकर आहे. त्याच्या मुलाने देखील सांगितले की या युवकांनी त्यांच्या परिवाराला खूप सहकारी केले. त्यामुळे समाजाच्या नावावर भेदभाव करणे चुकीचे असल्याचे त्याने सांगितले.

कौतुकास्पद…! आधी देशासाठी पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, आणि नंतर दिला बाळाला जन्म.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *