रस्त्यावर फिरल्यास पोलिस कारवाही, चंद्रपुर जिल्हाधिकार्‍यांची माहिती.

कोरोना विषाणूचा कहर सध्या संपूर्ण जगत चालू आहे, मात्र चंद्रपुर जिल्ह्यात सध्या एकही पॉजिटिव रुग्ण आठळला नाही आहे. परंतु सतर्कतेच्या दृष्टीकोणातून चंद्रपूरात रस्त्यावर फिरत आठळल्यास पोलिस कारवाही करण्यात येईल अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार हा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतो. ही गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात संचार बंदी लागू झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरत दिसल्यास पोलिस कारवाही करण्यात येणार आहे. असे निर्देश देण्यात आले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे राजेश मोहिते, जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गलहोत आदि उपस्थित होते. जिल्ह्यात विदेशातून आलेल्या ४ नागरिकांना निगराणीत ठेवण्यात आले आहे. आता पर्यंत १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या ८ उत्तम आयोग्यामुळे धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. बाहेरून आलेल्या नागरिकांच्या हातावर स्टॅम्प मारण्यात आले आहे. त्यांना केवळ १४ दिवस काळजी घेण्याचे सांगितण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *