दिलासादायक बातमी….! राज्यातील कोरोनाचे पहिले दोन रुग्ण झाले बरे, आज मिळणार हॉस्पिटल मधुन डिस्चार्ज.

दिलासादायक बातमी….! राज्यातील कोरोनाचे पहिले दोन रुग्ण झाले बरे, आज मिळणार हॉस्पिटल मधुन डिस्चार्ज.

सध्या संपूर्ण जगाला कोरोनाच्या विषाणूने त्रस्त केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश पुढील २१ दिवसांसाठी लॉकडाउन केला आहे. लोकांनी घाबरून न जाता आपल्या घरी राहावं, घरच्या बाहेर पडू नये, स्वतची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आता एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्रातील सर्वात पहिले जे दोन कोरोनाचे रुग्ण समोर आले होते, त्यांची प्रकृती आता बरी झाली असून त्यांना आज हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सलग २ आठवळे विलगीकरण कक्षात त्यांना ठेवण्यात आलं होतं त्यानंतर आता त्यांची परत कोरोना चाचणी केली असता त्यांचा रीपोर्ट निगेटिव आला आहे. त्यामुळे आता त्यांना लवकरच डिस्चार्ज देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *