गावांच्या सीमेवर देत आहे पोलिस पाटील पहारा.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून मोठ्या उपाययोजना व खबरदाऱ्या घेण्यात येत आहे. त्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन केला आहे, शहरी भागात पोलिस विनाकारण घराबाहेर निघणार्यांउना दंडुका देत आहे. त्यातच आता ग्रामीण भागात देखील कोरोना विरोधात लढण्यासाठी सर्व गावकरी पुढे सरसावले आहे.

राज्यातील अनेक गावांमध्ये पोलिस पाटील गावाच्या वेशीवर पहारा देत आहे. गावात येणार्यास प्रत्येकाची तपासणी व शहानिशा करूनच गावात प्रवेश दिला जात आहे. संपूर्ण देशात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गावात बाहेरच्या व्यक्तिला गावात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय अनेक गावांनी घेतला आहे. गावातील लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलिस पाटलांमार्फत करण्यात येत आहे. काही गावांमध्ये वाहनाला भोंगा लावत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *