मध्यप्रदेशात पुन्हा भाजपा सरकार, शिवराज सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्री.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मध्यप्रदेशातील अनेक घडामोडी नंतर मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकार कोसळून नव्याने भाजपाचे सरकार आले आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते शिवराज सिंह यांनी एका छोट्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवराज सिंह हे चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून मध्यप्रदेशचा कारभार सांभाळणार आहे. त्यांच्याशिवाय आज त्यांच्या कोणत्याही सदस्याने शपथ घेतली नाही.

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विटर द्वारे सांगितले की, कोव्हिड-१९ चा सामना करणे ही माझी प्राथमिकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *