कोरोना इफेक्ट…! त्याने चक्क १८६ किलोमीटर अंतर सायकलने केला प्रवास.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व शहरांमध्ये मेस, अभ्यासिका बंद करण्यात आल्या. त्यामुळे अमोल मांडलिक या तरुणाने पुणे सोडून गावाला जाण्याचं निर्णय घेतला मात्र बसेस व खाजगी वाहनांमध्ये प्रचंड गर्दी होती. कोरोनाच्या भीतीने त्याने १८६ किलोमीटरचे अंतर चक्क सायकलने प्रवास करून आपले घर गाठले.

अमोल मांडलिक हा तरुण पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात राहतो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने काळजीपोटी घरातील लोकांनी गावाकडे येण्याचा तगादा लावला. त्यामुळे त्याने गर्दीतून न जाण्याचा निर्णय घेत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सायकलचा पर्याय निवडला. आणि आपले गाव गाठले, त्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *