देशात जनता कर्फ्यू मात्र त्याने निराधार बांधवांना दिला चहा व नास्ता.

कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात जनता कर्फ्यू चालू आहे. सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर पडून नका असा आदेश देण्यात आला आहे. मात्र या आदेशामुळे जे निराधार नेहमी चौकात बसून असतात त्यांना मात्र या कर्फ्यूमुळे उपाशी राहावे लागत आहे असे लक्षात आल्यावर तो अस्वस्थ झाला त्याला हे सर्व बघवले नाही व त्याने त्या सर्व निराधारांना चहा व नास्त्याची सोय करून दिली. सदर घटना ही यवतमाळ मधील दारव्हा तालुक्यातील असून माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे. हा युवक दारव्हा मधील गोळीबार चौकातील असून त्याचे नाव बिललशहा नजिरशाह असे आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *