दहावीचा उर्वरित पेपर पुढे ढकलला, ३१ मार्च नंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात चालू असलेल्या १०वी चा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवारी दहावीचा शेवटचा पेपर होता, मात्र सध्याची राज्यातील कोरोनाच्या संख्येत झालेली वाढ पाहता सोमवारी होणार पेपर आता थेट ३१ मार्च नंतर घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २० मार्च ला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र १०वीची परीक्षा वेळापत्रकानुसार होईल असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे उर्वरित पेपर पुढे ढकलण्यात आला असून तो पेपर ३१ मार्च नंतर घेण्यात येणार आहे. 

चांदा टू बांदा बुलेटीन…! थोडक्यात ताज्या बातम्या हेडलाइन्स सह.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *