चांदा टू बांदा बुलेटीन…! थोडक्यात ताज्या बातम्या हेडलाइन्स सह.

पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा.
प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत राज्यातील मोठी शहरं बंद.
मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर शहर बंद राहणार.
औषधं, अन्नधान्य, दूध, भाजीपाला अशी जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरु राहणार.
गर्दी कमी झाली नाही तर रेल्वे आणि बससेवा दोन दिवसांनी बंद करण्यात येणार.
सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० वरून २५ टक्क्यांवर आणणार.
कष्टकऱ्यांना सुट्टीच्या काळात किमान वेतन किमान वेतन द्या, माणुसकी महत्वाची आहे.
नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी घरीच थांबावे, घराबाहेर पडू नये.
राज्यात कोरोनाचे 52 रुग्ण, 41 जणांची प्रकृती उत्तम.
हजारोंच्या उपस्थितीत  होणारे लग्न समारंभ थांबविण्याची गरज, गिरीश महाजन यांचे आवाहन.
कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *