धक्कादायक….! कोरोनाचे पेशंट असल्याने विष प्राशन केलेल्या तरुणाला रुग्णालयात नेण्यास शेजाऱ्यांचा नकार, उपचाराअभावी तरुणाचा मृत्यू.

कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णालयांत लोकं जाण्यास भीत आहे. रुग्णालयात गेले तर आपल्याला कोरोना संक्रमित होईल अशा भीतीने नागपुरातील एका वस्तीतील लोकांनी विष प्राशन केलेल्या तरुणाला रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण आहे म्हणून अनेकांनी त्याला रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यामुळे विष प्राशन  केल्यानंतर कित्येक वेळ घरीच राहिला. तथापि त्याला रुग्णालयात नेण्यास उशीर झाला त्यामुळे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाच्या भीतीमुळे विष प्राशन केलेल्या तरुणाला रुग्णालयात नेण्यास लोकं घाबरले असते तर त्या तरुणाचे प्राण वाचले असते अशी खंत त्या तरुणाच्या पत्नीने व्यक्त केली.

विष प्राशन केल्याने प्रमोद तडफडत आहे आणि आपले शेजारी आपली मदत करत नाही आहे हे पाहून त्याच्या पत्नीने आपल्या नातेवाईकांना फोन करून बोलावले, परंतु ते येत पर्यंत दोन अडिच तास निघुण गेले. त्यानंतर नातेवाईक आणि काही शेजार्‍यांनी मिळून प्रमोदला रुग्णालयात नेले मात्र उपचारादरम्यान प्रमोदचा मृत्यू झाला. त्यामुळे आता हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने आपले कर्तव्य विसरू नये असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *