मोठी बातमी..! पेट्रोल डिझेल च्या दरात मोठी घसरण.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून त्याचा फायदा आता भारतीय होत आहे. आज पेट्रोल डिझेल च्या भावात घसरण झाली आहे. आज पेट्रोल २ रुपये ६९ पैशांनी कमी होऊन ७०.२० वर आले तर डिझेल २ रुपये ३३ पैशांनी कमी होऊन ६३.०१ वर आले आहे.

सौदी अरब आणि रशियामध्ये तेलावरुण युद्ध सुरू असल्याने सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या व याचा फायदा भारतीयांना झाला. भारतात लागणारे ८४ % कच्चे तेल हे आयात केले जाते. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने देशाचा आयात खर्च कमी होईल यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला थोडा आधार मिळू शकतो. कच्च्या तेलाच्या किंमतीत १ डॉलर कपातीमुळे भारताचा आयात खर्च २९३६ करोड रुपयांनी कमी होतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घरसण झाल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे. 

मध्यप्रदेशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मोठा राजकीय भूकंप होणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *