राजकीय वर्तुळातील मोठी बातमी, ज्योतीरादित्य शिंदे (सिंधिया) यांचा कॉंग्रेसला रामराम..!

ज्योतीरादित्य शिंदे शिंदे यांनी  कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. ज्योतीरादित्य शिंदे यांचा भाजपा प्रवेश हा निश्चित मानला जात असून लवकरच ज्योतीरादित्य शिंदे हे याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षात मोठी खळबळ उळाली आहे. ज्योतीरादित्य शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे.  आज ज्योतीरादित्य शिंदे यांच्या वडिलांची जयंती असून वडीलच्या जयंतीच्या पर्वावर मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *