रश्मी ठाकरे आता ‘सामना’ च्या नव्या संपादक.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची आता ‘सामना‘ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपदकपदी निवळ  करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी  शपथ घेतल्यामुळे त्यांना सामनाच्या संपादक पदावरून दूर व्हावे लागले. त्यामुळे सामनाचे कार्यकारी संपादक असलेल्या संजय राऊत आतापर्यंत संपादाकाची भूमिका पार पडत होते आता मात्र सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे त्यातून ते पक्षाची भूमिका मांडत असतात. त्यामुळे शिवसेनेत सामनातील लेखांना अत्यंत महत्व असते. त्याच बरोबर कोणावर टीका कराची असेल तर सामनामधूनच ठाकरे शैलीत टीका करण्यात येते. त्यामुळे आता रश्मी ठाकरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची भूमिका मांडण्यात येत आहे. पहिले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षची भूमिका सामनाच्या माध्यमातून मांडली आता ही जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्या कडे आहे. 

गॅसच्या किंमतीत मोठी कपात, ‘असे’ आहे गॅसचे नवीन दर.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक व टेलीग्राम ग्रुप वर जाईन व्हा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *