मुख्यमंत्री महोदय आम्ही चुकलोच..! नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांची शोकांतीका.

राज्यात नुकत्याच झालेल्या कर्जमाफी योजनेच्या पार्श्वभूमीवर आता नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. कारण ज्या शेतकर्‍यांना फडणवीस सरकारच्या काळात कर्जमाफी भेटली त्यांनाचा दुसर्यां दा आता राज्यातील ठाकरे सरकारने कर्जमाफी दिली असल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेच्या यादीवरून दिसून येत आहे. त्यामुळे आता नियमित कर्ज भरणार्या  शेतकर्यां ना मुख्यमंत्री महोदय आम्ही चुकलोच अशी अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

सरकारने दिलेल्या कर्जमाफीत अजून तरी नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांसाठी काहीच तरतूद केलेली दिसत नाही. त्यामुळे आम्ही नियमित कर्ज भरतो ही आमची चूक आहे का ? असा सवाल आता संतप्त शेतकरी विचारू लागले आहे. त्यामुळे आता सरकारने चालू कर्ज असणार्यात शेतकर्‍यांसाठी काही न काही तरतूद करावी अशी चर्चा गावगाडयात होत आहे. सरसकट कर्जमाफी व्हावी सर्व शेतकर्‍यांना सरकारने समान वागणूक द्यावी अशीही चर्चा ग्रामीण भागात चालू आहे. 

राज्यात स्वतंत्र ओबीसींची जनगणना होण्याचे संकेत ? सर्व पक्ष्यांमध्ये एकमत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *