मोठी बातमी…! उद्या होणार शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची दुसरी यादी उद्या होणार आहे. राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत केली घोषणा.
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती,  त्यामध्ये १५ हजार ३५८ शेतकर्यां चा समावेश करण्यात आल होता. राज्यातील सुमारे ३४ लाख शेतकर्यां चा समावेश या कर्जमाफी योजनेत करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना आपले आधार कार्ड बँक पासबुक सोबत लिंक करून कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांना  कर्जमाफीसाठी हेलपाटा माराव्या लागू नये म्हणून कर्जमाफीत अचूकता यावी यासाठी कर्जमाफी टप्याटप्यात करण्यात येत आहे, असेही सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले. २४ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या यादीमध्ये अद्याप कोणतीही त्रुटि असल्याचे निदर्शनास आले नाही. असेही ते म्हणाले.
 

भन्नाट पैसे कामवायचे आहे मग करा ‘हा’ व्यवसाय.

One Comment on “मोठी बातमी…! उद्या होणार शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *