महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपाचा आज राज्यभर ‘धरणे’

राज्यातील महाविकास आघाडी विरोधात आज भाजपाने शेतकर्‍याची  फसवणूक व वाढत्या महिला अत्याचारा विरोधात धरणे पुकारले आहे. संपूर्ण राज्यभर हे धरणे करणार असून भाजपचे सर्व पदाधिकारी सामील होणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी संगितले आहे.
शेतकर्‍याचा  सातबारा कोरा करणार असे आश्वासन महाविकास आघाडीने दिले ते पाळले नाही. त्याच बरोबर शेतकर्‍याच्या  बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार रुपयाची मदत करणार असे सांगितले तेही आश्वासन पाळले नाही. फसवी कर्जमाफी करून शेतकर्‍याची फसवणूक केली अशा विविध मुद्द्यावर आज भाजपा पदाधिकारी प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे करणार आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या राज्यव्यापी धरण्यामध्ये सामील होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्भूमीवर हे धरणे किती महत्वाचे ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी ‘शेतकरी आणि महिला सुरक्षा’ मुद्यावरून विरोधक आक्रमक.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *