विदर्भात ‘या’ पिकासाठी आहे पोषक वातावरण आणि बाजारातही आहे प्रचंड मागणी….!

कापूस व तांदळाच्या उत्पादनासाठी विदर्भात अत्यंत पोषक वातावरण आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु आता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासावरून विदर्भात ‘काजू’ या पिकासाठी पोषक वातावरण असल्याचे त्यांच्या निर्देशनात दिसून आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाच्या शास्त्रज्ञांनी गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथील रोपवाटीकेला भेट देऊन त्या काजूंच्या झाडांची पाहणी केली. ही काजूची झाडे अत्यंत चांगल्या स्थितीत असल्याचे त्यांना दिसून आले. व विदर्भातील जमीन व वातावरण काजू या पिकासाठी पोषक आहे, असा निष्कर्ष अभ्यास गटातील शास्त्रज्ञांनी काढला. या रोपवाटीकेत आंबा, लिंबू, चिकू, आदि शेकडो झाडे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांरना फलबाग लागवळीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी रोपवाटीकेतील झाडे शेतकर्यांभना अनुदानावर उपलब्ध करून दिली जातात. या रोपांचा लाभ घेऊन फळबागा फुलवाव्या असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले.

फळबाग लागवळीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न.

विदर्भातील शेतकर्‍यांनी  आपली पारंपारिक शेती न करता आता नवीन उत्पादने आपल्या शेतीत घेतली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील शेतकरी उत्पन्नाच्या बाबतीत खूप मागे आहे. विदर्भात फळबाग लागवळीचे क्षेत्रही खूप कमी आहे. शेतकर्यांहना प्रोत्साहन दिले तर फळबागा वाढून शेतकर्यां चे दरडोई उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे शेतकर्यांळनी नवनवीन पिकांचे उत्पादन घेण्यास सुरवात केली पाहिजे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *