राज्यात होणार मोठी पोलीस भरती, ८ हजार पोलीस व ७ हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती.

राज्यात काळात मोठी पोलीस भरती होणार असून ८ हजार पोलीस व ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

                           राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणार्‍या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्य सरकार लवकरच येणार्‍या काळात मोठी पोलीस भरती करणार आहे. काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे अन्वेषण विभागाला भेट दिली, पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा केली व त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना ही घोषणा केली. येत्या काळात संपूर्ण पुणे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचं गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील शिक्षित तरुणांनासमोर रोजगारचा खूप मोठा प्रश्न उभा आहे. या भरतीच्या माध्यमातून त्यांना एक संधी मिळणार आहे

आंध्रातील कायद्याचा अभ्यास करणार

राज्यातील हिंगणघाट सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार असून बलात्कार रोखण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारनं केलेल्या कायद्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत, त्यासाठी आपण स्वत: येत्या २० फेब्रुवारीला आध्रप्रदेशात जाणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितलं


महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या टेलीग्राम चॅनल ला जॉईन करा
घडामोडी महाराष्ट्राच्या :- https://t.me/maharashtraupdates

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *