भारतातील तरुणाई मोबाइलमध्ये व्यस्त, आणि बेरोजगारीने त्रस्त.

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.

Facebook:-  https://www.facebook.com/Chanda_To_Banda-102685424601666/
Instagram:-  https://t.me/chandatobanda

बेरोजगारी ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. आज बेरोजगारांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कित्येक उच्च शिक्षित तरुण दररोज रोजगाराच्या शोधत फिरत असतांना दिसते. काहीं तरुण केवळ मोबाइल मध्ये गुंतलेला दिसून येते. मोबाइल आज जीवनातील सर्वात महत्वाची वस्तु बनली आहे. आज जगातील प्रत्येक दुसर्याब माणसाकडे मोबाइल आहे. पूर्वी एका जागून दुसर्याि जागेवर निरोप पाठविण्यासाठी चिट्टीचा उपयोग केला जात होता, परंतु आता ते मोबाइल च्या माध्यमातून केले जाते. मोबाइलच्या माध्यमातून अगदी सहजरीत्या संदेश पाठवता येतो अगदी कमी वेळात तो संदेश पोहचतो. बाकीच्या सर्व माध्यमांपेक्षा मोबाइलमुळे अगदी लवकर संदेश पोहचतो. मोबाइल हा आजच्या काळातील मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन आहे. लोकांना मोबाइलची सवय झाली आहे. त्यामुळे २४ तास मोबाइल चा उपयोग होत आहे.  त्यातच तरुणांचा मोबाइल कडे जास्तच कल दिसून येतो. आजचा तरुण हा दररोज नवनवीन फोटोशूट करून फेसबूक व्हाट्स अप यांच्यात स्टेटस उपडेट करण्यात व्यस्त आहे. आणि त्यातचा इंटरनेट च्या दरात झालेली करतरता यामुळे दिवसभर तरुणाई मोबाइल मध्ये गुंतून आहे रोज दीड जीबी डाटा संपविण्यात त्यांचा संपूर्ण दिवस जात आहे. या मोबाइल मुळे त्यांना आपल्या समोरील आयुष्याचा विसर पडला आहे. मोबाइलच्या अतीवापरामुळे त्यांना ते बेरोजगार असल्याची जाणीव त्यांना होत नाही आहे . कारण त्यांचा संपूर्ण दिवस हा आरामात निघत आहे. यामुळे त्यांचा विचार करण्याच्या शक्तीत कमतरता निर्माण होत आहे. त्यांना आपल्या जीवनाबद्दल विचार करायला वेळ नाही, अशी परिस्थित आज निर्माण होत आहे.
             काही  तरुण आपल्या भविष्याबद्दल सतत काही ना काही करत असतात परंतु देशात खूप स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे आज नोकरी मिळवणे खूप कठीण आहे. नवीन नोकर्यां ची निर्मिती खूप कमी होत आहे आणि नोकर्या  करणार्यां ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी मिळणे तर आज खूप जास्त कठीण आहे. सातत्याने प्रयत्न करून देखील काही तरुणांना अपयशचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एकंदरीत भारतातील तरुणाई ही मोबाइलमध्ये व्यस्त आणि बेरोजगारीने त्रस्त असल्याचे दिसून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *